Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोरगावजवळ अपघातात महिला ठार
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 10 : बोरगाव, ता. साताराजवळ चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात महिला ठार झाली तर अन्य एक जण जखमी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संगीता दिलीप नलावडे, (वय 45), रा. नेवाळीवस्ती, चिखली, जि. पुणे या आपल्या कुटुंबीयांसह चिखली येथून कराडकडे आय टेन्टी नंबर एमएच - 14 डीएक्स 0693 या वाहनाचा बोरगावजवळ महामार्गावर आज सकाळी 8 वाजता टायर फुटून, वाहन पलटी होऊन त्यात संगीता नलावडे या गंभीर तर त्यांचा मुलगा रोहन दिलीप नलावडे (वय 20 ) हा किरकोळ जखमी झाला. दोघांनाही तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना संगीता नलवडे यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात
झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: