Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘आयसीसी’ पुरस्कारांवर ‘विराट’ मोहर
ऐक्य समूह
Wednesday, January 23, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: sp1
कसोटी आणि एकदिवसीय संघांचाही कर्णधार
5दुबई, दि. 22 (वृत्तसंस्था) : आयसीसीने 2018 मधील कामगिरीच्या आधारे क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी केली. त्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने ‘क्रिकेटर ऑफ द इयर’, ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ आणि ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ हे तिन्ही पुरस्कार मिळवले. असा पराक्रम करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आयसीसीने ‘टीम ऑफ द इयर’ची घोषणा केली असून 2018 मधील कामगिरीनुसार निवडण्यात आलेल्या संघांमध्ये विराटला आयसीसीने कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार घोषित केले आहे. विराटबरोबरच टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बूमराहने आयसीसीच्या दोन्ही संघांमध्ये स्थान मिळवले आहे. युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतने सर्वोत्कृष्ट उगवत्या क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवला आहे. विराटला पहिल्यांदाच आयसीसीचा ‘टेस्ट प्लेअर ऑफ द इयर’ हा किताब मिळाला आहे. त्याला ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ हा किताब दुसर्‍यांदा मिळाला आहे. 2018 मध्येही विराटला हा किताब मिळाला होता.
आयसीसीच्या कसोटी संघात भारत व न्यूझीलंडच्या तीन श्रीलंका, विंडीज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. आयसीसीच्या एकदिवसीय संघात सर्वाधिक भारतीय आणि इंग्लंडच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. भारत आणि इंग्लंडच्या प्रत्येकी चार, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसी एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (भारत), जॉनी बेयरस्टो (इंग्लंड), विराट कोहली (भारत) (कर्णधार), ज्यो रूट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जोस बटलर (इंग्लंड) (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्तफिझुर रहीम (बांगलादेश), राशिद खान (अफगाणिस्तान), कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बूमराह (भारत).
आयसीसी कसोटी संघ : टॉम लॅथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणरत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत) (कर्णधार), हेन्री निकोल्स (न्यूझीलंड), ऋषभ पंत (भारत) (यष्टीरक्षक), जेसन होल्डर (वेस्ट इंडीज), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लॉयन (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बूमराह (भारत), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान).

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: