Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नागठाणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ऐक्य समूह
Thursday, February 07, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 :  सातारा तालुक्यातील येथे मासेमारी करणार्‍या एका महिलेच्या मृत्यू झालेल्या मोठ्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अक्षय राजेंद्र मोहिते (वय 22), रा. नागठाणे, ता. सातारा याने दि. 15 ऑगस्ट 2018 रोजी नागपंचमीच्या दिवशी मासेमारी करणार्‍या महिलेच्या मृत्यू झालेल्या मोठ्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीवर 10 वाजता  बलात्कार केला.  नंतर वेळोवेळी धमकावून  तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामध्ये तिला दिवस गेल्याने याबाबत कुणाला, काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. 
याबाबत अल्पवयीन मुलीच्या मावशीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: