Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंबाटकी घाटात अ‍ॅसिडचा टँकर पलटी
ऐक्य समूह
Friday, February 08, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re2
5भुईंज, दि. 7 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट उतरताना तिसर्‍या वळणावर ब्रेक निकामी झाल्याने अ‍ॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की़ (एम.एच.43 यू 4260) हा नायट्रिक अ‍ॅसिडने भरलेला टँकर मुंबईहून उटी येथे निघाला होता. खंबाटकी घाट उतरताना या टँकरचे बे्रक निकामी झाले. त्यामुळे चालक नियाज अहमद (वय 33 रा.उत्तरप्रदेश) याचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा टँकर घाटातील तिसर्‍या वळणावर पलटी झाला. सुदैवाने हा टँकर दरीत कोसळला नाही. टँकर पलटी झाल्यामुळे त्यात असणारे नायट्रिक अ‍ॅसिड टाकीतून बाहेर पडल्याने मोठया प्रमाणात धूर निर्माण झाला.     
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी खंबाटकी घाटातील वाहतूक बंद करून बोगदा मार्गाने वळवली. घटनेचे गांर्भीय ओळखून किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक दलाचा बंब त्वरित पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: