Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विंग येथे महिलेच्या हातावर ब्लेडने वार, चौघांवर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, February 08, 2019 AT 11:32 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि.7 : चौघांनी महिलेच्या हातावर हेक्साब्लेडने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना विंग, ता. कराड येथे सोमवारी घडली. सीमा दिलीप जाधव (वय 25) यांच्या फिर्यादीवरून कराड  तालुका पोलीस ठाण्यात सूरज प्रकाश शेडगे, शारदा प्रकाश शेडगे, शीतल सूरज शेडगे, धनाजी प्रकाश शेडगे (सर्व रा.विंग) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सीमा जाधव यांच्या घरासमोर सूरज शेडगे याने पाण्याची पाइप टाकली होती. मात्र ती नादुरुस्त असल्याने त्यामधून पाणी वाहत होते. त्यामुळे ती पाइप दुरुस्त कर, असे जाधव म्हणाल्या. त्यामुळे चिडून जावून सूरज याने हेक्सा ब्लेडने त्यांच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले तर शारदा शेडगे, शीतल शेडगे, धनाजी शेडगे यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून कराड  तालुका पोलीस ठाण्यात सूरज शेडगे याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: