Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुझफ्फरनगर दंगली प्रकरणी सात दोषींना जन्मठेप
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: na1
5उत्तरप्रदेश, दि. 8 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये 2013 मध्ये मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल, अशी या दोषींची नावे आहेत. कवाल या गावात ही दंगल झाली होती.
मुझफ्फरनगर येथे 2013 मध्ये दंगल झाली होती. या दंगलीत गौरव आणि सचिन या दोघांच्या हत्येप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हिमांशू भटनागर यांनी हा निर्णय दिला.         
ऑगस्ट 2013 रोजी कवाल या गावात गौरव आणि सचिन या दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील अंजूम खान यांनी सांगितले की, बुलंदशहर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. सुरक्षेअभावी सर्व दोषींना न्यायालयात नेता आले नाही आणि शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली.
                         
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: