Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिंती येथे एकास मारहाण, आठ जणांवर गुन्हा
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 10 : सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आठ जणांनी एकास काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सागर तानाजी मेणकर (वय 24), रा. जिंती, ता.कराड याने कराड तालुका पोलिसात दिली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माव्या गुजले, दीपक गुजले, दत्ता गुजले, बाळू गुजले, अनिल गुजले, आबा गुजले, दादा गुजले, अजित गुजले (सर्व रा.जिंती, ता.कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी सागर मेणकर हा अजित गुजले याच्या घरी स्पिकर लावल्याचे पैसे मागण्याकरिता गेला होता. त्यावेळी दादा गुजले याच्या आईशी सागरची वादावादी होऊन भांडणे झाली होती. 
सायंकाळी सहाच्या सुमारास माव्या गुजले याने तू सकाळी दादा गुजले याच्या आईस का मारले, असे म्हणू लागला. त्यावेळी सागर त्यास समजावून सांगू लागला असता माव्या गुजले याने हातातील काठीने सागर यास मारहाण करण्यास सुरूवात केली व दीपक गुजले, दत्ता गुजले, बाळू गुजले, अनिल गुजले, आबा गुजले, दादा गुजले, अजित गुजले यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत सागर मेणकर याने कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: