Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तडीपार गुंड सातार्‍यात जेरबंद
ऐक्य समूह
Wednesday, February 13, 2019 AT 11:40 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 12: तडीपारी आदेशाचा भंग करत सातारा शहरात फिरणार्‍या संजय एकनाथ माने (वय 36), रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार याला मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून  जेरबंद केले. अटकेतील मानेच्या विरोधात सातारा शहर पेालीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सदरबझार मधील लक्ष्मी टकेडी येथे  राहणार संजय माने हा सराईत गुन्हेगार असून त्याला मे 2018 मध्ये दोन वर्षे कालावधीसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असणारा माने हा मंगळवारी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक विकास जाधव यांना मिळाली. यानुसार त्यांनी हवालदार कांतीलाल नवघणे, मुबीन मुलाणी, गोगावले यांना कारवाईच्या सूचना दिल्या. यानुसार त्यांनी बसस्थानकात जावून त्यास पकडले. पकडलेल्याने स्वत:चे नाव संजय माने असे सांगितले. माने हा तडीपार असतानाही सातारा शहरात फिरत असल्याचे समोर आल्यानंतर त्याला सातारा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याची फिर्याद हवालदार कांतीलाल नवघणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: