Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा विराट, बूमराहची ‘वापसी’, मार्कंडेला स्थान
ऐक्य समूह
Saturday, February 16, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: sp1
5मुंबई, दि. 15 (वृत्तसंस्था) : माजी कसोटीपटू एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या दोन टी-20 सामन्यांची मालिका आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बूमराह आणि के. एल. राहुल या तिघांची संघात वापसी झाली आहे. विशेष म्हणजे दिनेश कार्तिकला एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे. टी-20 संघात पंजाबचा लेगी मयांक मार्कंडेला संधी देण्यात आली आहे.
टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी घोषित केलेल्या संघात कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बूमराह आणि लोकेश राहुल यांची वापसी झाली आहे तर दिनेश कार्तिकला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. मात्र, टी-20 संघातील त्याचे स्थान कायम आहे. विशेष म्हणजे युवा खेळाडू मयांक मार्कंडेला टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवला टी-20 मध्ये स्थान देण्यात आले नाही. जलदगती गोलंदाज उमेश यादवला टी-20 संघात स्थान मिळाले आहे. टी-20 मध्ये डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बूमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.
पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय संघ : विराट कोहली, (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल.
उर्वरित तीन वनडेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, भुवनेश्‍वरकुमार, लोकेश राहुल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: