Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
ऐक्य समूह
Friday, February 22, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: re5
5फलटण, दि. 21 : राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम, शहरातील विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळेवाटप, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळेवाटप करून साजरा करण्यात आला. पुलवामा येथील शहीद जवान व अतिरेकी हल्ल्याची किनार असल्याने उत्साहापेक्षा सामाजिक बांधिलकीची जोड अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषद  आणि जिल्हा नियोजन मंडळ सदस्या, सुविद्य पत्नी अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी सकाळी रणजितसिंह यांचे औक्षण केले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर माजी खासदार व प्रदेश काँग्रेेसचे उपाध्यक्ष हिंदुराव नाईक-निंबाळकर व सौ. मंदाकिनी नाईक-निंबाळकर या माता-पित्यांचे, काकी श्रीमती मंगलादेवी नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सौ. मनीषा नाईक-निंबाळकर, अच्युतराव खलाटे व थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना फळेवाटप, शहरातील प्रभाग 3 मधील रस्ता खडीकरण, डांबरीकरण, समाजमंदिर नूतनीकरण, स्मशानभूमी सुशोभीकरण, प्रभाग 11 मधील रस्ता   काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा पाइपलाइन,कॉलेज रोडवर पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांचा शुभारंभ रणजितसिंह यांच्या हस्ते करण्यात आला. स्वराज प्रकल्प, निंभोरे, ता. फलटण येथील अधिकारी, कर्मचार्‍यांच्यावतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, फळे व खाऊ वाटप करण्यात आले. मराठा समाज विकास संस्था संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण विद्यालयात रक्तदान शिबिर व रामभाऊ शेंडे मित्रमंडळातर्फे अपंग आणि रुग्णांसाठी मोफत रिक्षासेवेचे लोकार्पण रणजितसिंह यांच्या हस्ते झाले.
पुलवामा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हार, गुच्छ फुले, भेटवस्तू न आणता जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या व शालेय साहित्य भेट स्वरुपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूलमध्ये कार्यक्रमात मान्यवर व शुभेच्छा देण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातून आलेले काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आणलेल्या वह्या व शालेय साहित्य स्वीकारण्यात आले. तेथे शालेय साहित्य व वह्यांचा मोठा साठा जमला.  जमलेले शालेय साहित्य जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना रणजितदादांनी संबंधितांना दिल्या. एनएसयूआय आणि फलटण मेडिकल फौंडेशन संचलित रक्तपेढीच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात युवक-युवतींनी रक्तदान केले. सुमारे 51 बॅग रक्त जमा करण्यात आले. रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी रणजितदादांना शुभेच्छा दिल्या. रणजितदादा व एनएसयूआय पदाधिकार्‍यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वाठार-निंबाळकर व वाखरी येथे अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये 10 लाख रुपये खर्चाच्या वाखरी येथील सभामंडपाचा समावेश आहे. सायंकाळी 5.30 वाजता उपळवे, ता. फलटण येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखाना कार्यस्थळावर सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या शुभेच्छा व शालेय साहित्य स्वीकारल्यानंतर कोळकी, ता. फलटण येथे पै. स्वागत काशिद यांनी आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन व मल्लांना शुभेच्छा देण्यासाठी रणजितदादा उपस्थित राहिले. आ. जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रायगड ग्रुपचे अध्यक्ष तानाजीराव जगताप, एनएसयूआयचे अध्यक्ष शिवराज मोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्तीच्या आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, माजी आमदार मदन भोसले, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी जयकुमार शिंदे, पाचगणी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, शिवाजीराव फडतरे, नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके), विजयराव कणसे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, सुनील पाटील, राष्ट्रीय काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे, नगरसेवक अशोक जाधव, राहुल शहा, खटाव तालुकाध्यक्ष विवेक देशमुख, कराड उत्तर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, तालुकाध्यक्ष सौ. नंदिनी सावंत, शहराध्यक्ष सौ. मुक्ती शहा, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जाकीर पठाण, अल्पसंख्याक सेलचे राज्य सरचिटणीस आदिल मोमीन, शिवराज मोरे, नगरसेवक सचिन अहिवळे, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, नगरसेविका सौ. मदालसा कुंभार, सौ. ज्योती खरात, सौ. रश्मी नाईक-निंबाळकर, सौ. मीना नेवसे, ऋषिकेश नाईक-निंबाळकर, अरुण खरात, रणजितदादा मोटार मालक वाहतूक सहकारी संस्था चेअरमन अशोकराव भोसले, व्हाईस चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे, बाजार समितीचे माजी संचालक सिराज शेख, अमित
कदम, सातारा शहराध्यक्ष रझिया शेख, साखर कारखाना संचालक लतीफ तांबेळी, बबलू कदम, अनिकेत कदम, मराठा क्रांती मोर्चाचे माउली सावंत, कुमार भट्टड, डॉ. जे. टी. पोळ, रवींद्र बर्गे, मोहनराव रणवरे, रोहित झांजुर्णे, पिंटू ईवरे, अमित रणवरे व जिल्ह्यातील मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे वा समक्ष भेटून रणजितदादा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: