Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍याच्या तहसीलदारांसह जिल्ह्यातील 13 अधिकार्‍यांच्या बदल्या
ऐक्य समूह
Friday, February 22, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 21 : सातार्‍याचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील 11 अधिकार्‍यांच्या बदल्या राज्य शासनाने आज केल्या. या बदल्यांचे आदेश तत्काळ अंमलात येत असून संबंधित अधिकार्‍यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत.
पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमतीआरती भोसले यांची पुणे येथे भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांची हवेली, जि. पुणे येथे उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली. भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अरविंद बाबूराव कोळी यांची सोलापूर येथे (भूसंपादन क्र. 4) उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. रोहयोचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांची जुन्नर, आंबेगाव, मंचर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांची पुणे महसूल विभागात तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. फलटणचे तहसीलदार विजय पाटील यांची बारामती येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. कोरेगावच्या तहसीलदार श्रीमती स्मिता पवार यांची पुणे येथे तहसीलदार तथा सहाय्यक पुनर्वसन अधिकारी कुकडी प्रकल्प येथे बदली करण्यात आली. कराडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची माढा येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. महसूल विभागाच्या तहसीलदार श्रीमती अमिता तळेकर यांची पुणे येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
वाईचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची पन्हाळा येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. विशेष कार्यकारी दंडाधिकारी दशरथ काळे यांची खंडाळ्याच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली. खटावच्या तहसीलदार श्रीमती जयश्री आव्हाड यांची सातारा येथे विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. सातार्‍याचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांची पुणे येथे अप्पर चिटणीस म्हणून बदली करण्यात आली. या बदल्यांचे आदेश तत्काळ अंमलात येत असून संबंधित अधिकार्‍यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: