Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भूविकास बँक चौकात घरफोडी
ऐक्य समूह
Tuesday, February 26, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo2
लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची शक्यता
5सातारा, दि. 25 : गेल्या दोन दिवसात शाहूपुरीमध्ये दिवसाढवळ्या चोरीचे सत्र सुरू असतानाच काल रात्री येथील भूविकास बँक चौकात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील  शाहू स्टेडियम नजीक असणार्‍या भूविकास बँक चौकामध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून आतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. संबंधित फ्लॅटधारक बाहेरगावी गेले होते आज सकाळी ते आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. लंपास झालेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे, अशी माहिती मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: