Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची वर्णी
ऐक्य समूह
Tuesday, February 26, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: lo1
पंकज देशमुख यांची पुणे येथे बदली
5सातारा, दि. 25 : सातारचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची वर्णी लागली आहे. देशमुख यांची अवघ्या सात महिन्यात बदली झाल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
नव्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या 2011 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या पुणे येथील वाहतूक विभागाच्या उपआयुक्त होत्या. दरम्यान, याच पदावर आता सातारचे एसपी पंकज देशमुख यांची बदली झाली आहे. त्यांनी सात महिन्याच्या कालावधीत पोलीस प्रशासनात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेली वाहतूक शाखाच विसर्जित केली. याशिवाय सात महिन्यात ज्या गंभीर घटना घडल्या त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याबाबत विलंब झाला, मात्र तपासाअंती गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.    
ते सातार्‍याला येण्यापूर्वी उस्मानाबाद येथे कार्यरत होते. तेजस्वी सातपुते या मूळच्या शेवगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर येथील आहेत. त्यांचे बी.एस्सी. पर्यंतचे शिक्षण बारामती येथे झाले असून त्यानंतर त्यांनी एलएल.बी.साठी प्रवेश घेतला. पहिली तीन वर्षे झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात त्या आयपीएस झाल्या. यामुळे एलएल.बी.चे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे. आई शिक्षिका असून वडिलांचा व्यवसाय आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: