Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक ठार
ऐक्य समूह
Tuesday, February 26, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: re5
5कराड, दि. 25 ः मलकापूर येथे डी मार्ट मॉलसमोर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत पादचारी जोतिराम रंगनाथ बुरसे (वय 70, रा. नांदगाव, ता. कराड) हे ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, जोतिराम बुरसे हे सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मलकापूर येथे डी मार्ट मॉलसमोरु महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: