Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण-सातारा मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार
ऐक्य समूह
Tuesday, February 26, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 25 : फलटण-सातारा मार्गावर मिरगाव हद्दीत अंदाजे 40/45 वर्षे वयाच्या मोटारसायकलस्वारास अज्ञात वाहनाने रविवारी (दि. 24) रात्री धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात आणले असता मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृताची ओळख न पटल्याने मिरगावचे पोलीस पाटील दत्तात्रय भगवान सरक यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
अपघातातील मोटारसायकलच्या (एमएच-11-एजे-7620) आधारे मालकाचा शोध घेतला जात असल्याचे  पोलिसांनी सांगितले. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची दाढी वाढली आहे, जीन्स पँट परिधान केली आहे. या व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: