Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍यांच्या उत्पन्नाने निचांक गाठला : सुळे
ऐक्य समूह
Monday, March 04, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) :  शेतकर्‍यांच्या उत्पन्नाने गेल्या 14 वर्षांतील निचांक गाठला आहे. 2018 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान शेतकर्‍यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदर सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशाच्या कृषी उत्पन्नात दरवर्षी 2.7 टक्क्यांनी वाढ होत आहे. पण ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 दरम्यान गेल्या 11 तिमाहीच्या तुलनेत हे उत्पन्न लक्षणीयरीत्या घटले आहे. एनडीए सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे. कृषी उत्पादन वाढले असले तरी शेतकर्‍यांचे उत्पन्न मात्र घटले आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
2004 ला ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कृषी उत्पन्न 1.1 टक्यांनी घटले होते. आता जवळपास एवढीच घट 2018 ला ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये दिसून आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 मध्ये कृषी उत्पादन 2.67 टक्क्यांनी वाढले. पण या कृषी मालाला आता 2.04 टक्के इतकाच भाव मिळाला आहे. यामुळे कृषी मालाचा दर 0.61 टक्यांनी घसरलाय. परिणामी शेतकर्‍यांचे उत्पन्न घटल्याचे समोर आले आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारवर हल्ला केला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे, असे सुळे म्हणाल्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: