Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन संशयितांना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
मंदार उर्फ बबलू नगरकर खून प्रकरणी आणखी एक जण अल्पवयीन ठरला
5सातारा, दि. 5 : सातारा येथील मंदार उर्फ बबलू नगरकर याच्या खून प्रकरणी दोन संशयितांना न्यायालयाने 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. दरम्यान, या खून प्रकरणातील आणखी एक संशयित अनुप इंद्रपाल कुरेल हा युवक अल्पवयीन ठरला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मंदार उर्फ बबलू नगरकर (वय 30), रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा याचा रविवारी रात्री खून करून मृतदेह पेटवून दिल्याची घटना घडली होती. प्राथमिक पुराव्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमीर इम्तियाज मुजावर ( वय 20), अनुप इंद्रपाल कुरेल, अनिकेत बाळासाहेब माने (वय 20), रा. पिरवाडी, ता. सातारा या तिघांसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी क्षुल्लक वादावरून मंदार उर्फ बबलू नगरकर याचा खून केल्याची कबुली दिली होती. 
त्यांना काल अटक केल्यानंतर आज न्यायालयात उभे केले असता आमिर इम्तियाज मुजावर, अनिकेत बाळासाहेब माने या दोघांना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली तर या घटनेतील संशयित अनुप इंद्रपाल कुरेल हा अल्पवयीन ठरला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: