Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बॉम्बे रेस्टॉरंटजवळ तिहेरी अपघातात एक ठार, तीन जखमी
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 : येथील बॉम्बे रेस्टॉरंटजवळ मंगळवारी सकाळी ट्रक, स्विफ्ट डिझायर आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या तिहेरी अपघातात एक जण ठार तर अन्य तीन जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की स्वप्निल लालासाहेब पडवळ (वय 28), रा. शेंद्रे, ता. सातारा हे पुणे येथे नोकरी करतात. त्यांच्या पत्नी प्रियांका स्वप्निल पडवळ या सातारा येथील एका खासगी शिक्षण  संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात. हे दांपत्य आज सकाळी दुचाकीवरून शेंद्रे येथून साताराकडे निघाले होते. प्रियंका यांना शिक्षण संस्थेत सोडून स्वप्निल पुढे अन्य वाहनाने पुण्याकडे जाणार होते. तत्पूर्वी येथील बॉम्बे रेस्टॉरंट जवळ असणार्‍या कणसे होंडा शोरूम च्या समोर भरधाव वेगाने ट्रकने स्विफ्ट डिझायरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की स्विफ्ट डिझायरने वळण घेऊन पाठीमागून आलेल्या दुचाकीवर आदळली. या तिहेरी अपघातात स्वप्निल लालासाहेब पडवळ हे गंभीर जखमी झाले तर प्रियांका स्वप्निल पडवळ, जितेंद्र
मधुकर गोडसे, मनोज मधुकर पोक्षे हे तीन जण जखमी झाले. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी स्वप्निल पडवळ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अन्य तीन जणांवर उपचार सुरू आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: