Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोचरेवाडीत बिबट्याकडून रेडकू ठार
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: re2
5चाफळ, दि. 5 : चाफळ भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून सोमवारी रात्री 10.30 सुमारास कोचरेवाडी, ता. पाटण येथे घरात घुसून बिबट्याने एक वर्षाचे रेडकू पळवून नेल्याची घटना घडली. सदरचा प्रकार लोकांसमोरच घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चाफळ विभागातील पश्‍चिमेस डोंगरमाथ्यावर असलेल्या कोचरेवाडी, ता. पाटण या गावातील बहुतांश लोक शेतीसह पशुपालन व्यवसाय करतात. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दगडू कोंडिबा मोहिते हे कुटुंबीयांसह घरातील पडवीला बसले होते तर एक वर्षाचे रेडकू ही तिथेच बसलेले होते. यावेळी अचानकपणे घरात घुसलेल्या बिबट्याने रेडकावर हल्ला करत त्याला उचलून नेले. यावेळी घरातील लोकांनी आरडाओरड केली. मात्र बिबट्याने रेडकाला घेऊन तेथून धूम ठोकली.
बिबट्याने घरात घुसून केलेल्या अनपेक्षित हल्ल्याने गावात घबराट पसरली आहे. वनविभागाने सदर घटनेचा पंचनामा करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: