Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अमेरिकेने व्यापारी सवलती काढल्याने भारताला मोठा धक्का
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : व्यापाराच्या बाबतीत भारताला दिलेला विशेष पसंतीचा दर्जा अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने काढून घेण्याचा निर्णय  घेतला आहे. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्‍या वस्तूंवरील करसवलती रद्द होणार आहेत. अमेरिका सरकारचा हा निर्णय दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापाराला धक्का पोहोचवणारा असल्याचे मानले जात आहे.
जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्स (जीएसपी) अंतर्गत भारताकडून आयात केल्या जाणार्‍या सुमारे 400 अब्ज किंमतीच्या वस्तूंवर अमेरिका कोणतेही शुल्क आकारत नव्हते. त्यामुळे भारताला 19 ते 20 कोटींचा फायदा होत होता. मात्र, अमेरिकेने जीएसपी दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताला आता हा फायदा मिळणार नाही.
अमेरिकी सिनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ही घोषणा केली. भारताबरोबरच तुर्कीचाही जीएसपी दर्जा काढून घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. भारतीय बाजारात अमेरिकेला न्याय्य व योग्य प्रवेश मिळवून देण्याची हमी भारताकडून मिळत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
भारत प्रत्युत्तर देणार नाही!
अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताला कुठलाही मोठा फरक पडणार नसल्याचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी सांगितले. जीएसपी दर्जामुळे भारताला होणारा फायदा तुलनेने क्षुल्लक होता. त्यामुळे भारत या निर्णयाला प्रत्युत्तर देणार नाही. अमेरिकेच्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क आकारणार नाही, असे वाधवान यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: