Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
ऐक्य समूह
Thursday, March 07, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : सातारा शहर, शाहूपुरी आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून जुगाराचे साहित्य व 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संयुक्त पथकाला मिळालेल्या माहितीवरून येथील प्रीती हॉटेलच्या पाठीमागे पानटपरीच्या आडोशास छापा टाकला असता त्या ठिकाणी श्रीकांत ज्ञानदेव लोहार (वय 34), रा. अंबवडे, ता. जि. सातारा, राजेंद्र निवृत्ती शेडगे ( वय 52), रा. एमआयडीसी कॉलनी, ता. सातारा, वृषभ तुळशीराम मोरे ( वय 22), रा. गोजेगाव, भोसलेवाडा, ता. जि. सातारा हे तिघे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व सॅमसंग कंपनीचा मोबाईल, अ‍ॅक्टिवा दुचाकी आणि नोकिया कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.
तांदूळवाडी, ता. कोरेगाव येथील सलीम सिकंदर शेख याच्या सरफराज मटन शॉप पाठीमागील शेडच्या आडोशाला सुरू असणार्‍या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी प्रकाश लक्ष्मण कणसे (वय 65), रा.महागाव, ता. जि. सातारा, रवी प्रकाश सोनवणे (वय 27), रा. प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, सातारा, राहुल भगवान पवार (वय 37), रा. क्षेत्रमाहुली, ता. जि. सातारा, अर्जुन राजाराम पवार (वय 48), रा. क्षेत्रमाहुली,  ता. जि. सातारा हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नोकिया मोबाईल, स्प्लेंडर प्लस दुचाकी, सॅमसंग कंपनीचे 3 मोबाईल, बुलेट, महिंद्रा कंपनीची मोटरसायकल असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे इनायतुल्ला महामूद खान मुल्ला, अंकुश रामराव यादव, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सचिन आनंदराव पाटील, बोरगाव पोलीस ठाण्याचे सुभाष ज्ञानदेव भुरे यांनी सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: