Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड येथे नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, March 07, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि.6: कृष्णा नदीत महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याचा प्रकार बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास घडला. सचिन रमेश वैरागी (वय 16 वर्षे), रा.मंगळवार पेठ, कराड असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी तुकाराम लक्ष्मण वैरागी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सचिन वैरागी हा रुक्मिणी गार्डन येथे राहतो. त्याचे वडील रमेश वैरागी हे गवंडीकाम करतात. बुधवारी तो मित्रांसह कृष्णा नदीत पोहायला गेला होता. नदीत पोहणे शिकत असताना अचानक तो बुडायला लागला. त्याच्यासह अन्य तिघेजण पोहायला नदीत गेले होते.
सचिनला पोहायला येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ
लागला. त्याला बाहेर पडता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊन बुडाला. हा प्रकार समजल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद शहर पोलिसात
 झाली आहे.
     
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: