Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्राचार्य डॉ. अशोक भोईटे आदर्श पुरस्काराने सन्मानित
ऐक्य समूह
Friday, March 08, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 7 : पंढरपूर येथील बहुजन क्रांती महासंघ व लिंगायत प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात  डॉ. अशोक भोईटे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  आ. भारत भालके यांच्या हस्ते आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कल्याणराव काळे, नानासाहेब लिगाडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शैला गोडसे, बहुजन क्रांती महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संदीप पाटोळे, प्रदेशाध्यक्ष संभाजी साठे, लिंगायत प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राजेश्‍वर कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्राणिशास्त्र या विभागामध्ये अध्यापन केले आहे. त्यांची 2005 मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्यापासून आपल्या प्रशासकीय कामामधून त्यांनी स्वतंत्र  ठसा उमटविला आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदाच्या काळात त्यांनी आदर्श कार्य केले आहे.
मलकापूर, सातारा, कोल्हापूर व  पुणे या ठिकाणी प्राचार्य म्हणून केलेल्या कार्याची  केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग अशा सर्व ठिकाणी नोंद घेतली गेली आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्र. कुलगुरू व कुलगुरू पदावर त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पंढरपूर येथे जूनमध्ये आल्यापासून त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पंढरपूर महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. या सन्मानाबद्दल महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य  बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य  एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव, शिक्षक-शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी आणि  रयतप्रेमींनी  त्यांचे अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: