Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वच्छ सर्वेक्षणात महाबळेश्‍वर द्वितीय
ऐक्य समूह
Saturday, March 09, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: re2
5महाबळेश्‍वर, दि. 8 : महाबळेश्‍वर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशात 8 वा तर 25 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (पश्‍चिम विभाग) द्वितीय क्रमांक पटकवला असून कचरामुक्त शहरांच्या यादीमध्ये केंद्र शासनाचे तीन तारांकित (थ्री स्टार) मानांकन प्राप्त केले आहे. हागणदारीमुक्त (जऊऋ++) शहर म्हणून महाराष्ट्रातील मोजक्या शहरांमध्ये मानांकन प्राप्त केले आहे. मानांकन मिळालेल्याची माहिती महाबळेश्‍वर नगरपालिकेत कळताच शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
एकूण तीन प्रकारांमध्ये सर्वोच्च कामगिरी करत नगरपरिषदेने थेट स्थळ निरीक्षणामध्ये (ऊळीशलीं ेलीर्शीींरींळेप) 1250 पैकी 1233 सर्वाधिक गुण प्राप्त केले असून संपुर्ण देशात हे सर्वाधिक गुण आहेत. दिल्ली येथील विज्ञान भवनात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत व केंद्रीय आवास आणि विकास मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशन संचालक व्ही. के. जिंदल, महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत महाबळेश्‍वरकरांच्यावतीने हा पुरस्कार नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसेवक युसूफ शेख, कुमार शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी स्वीकारला.
यावेळी पालिकेच्या स्वच्छता सभापती आफरिन वारुणकर, बांधकाम सभापती सुनीता आखाडे, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जंगम, नगरसेविका विमल ओंबळे, शारदा ढाणक, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक बबन जाधव, सल्लागार अभियंता एस. एम. भडके, स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी सचिन दीक्षित, स्वच्छता मुकादम श्रावण कांबळे, रोहित बांदल, स्वच्छता कर्मचारी शांताराम मोरे उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: