Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपची मदनदादांना साद...! पण मदनदादांना काय मिळणार?
vasudeo kulkarni
Saturday, March 09, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: re1
5भुईंज, दि. 8 : किसनवीर कारखाना कार्यस्थळावर मदन भोसले हे उद्या, दि. 9 रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची उत्सुकता लागली आहे. तब्बल 45 वर्षांचा राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले वडील प्रतापराव भोसले हे काँगे्रसचे ज्येष्ठ मातब्बर नेते. एके काळी महाराष्ट्रासह दिल्लीला हलवणारे म्हणून नावलौकिक असलेल्या प्रतापराव भोसले यांच्या मुशीत तयार झालेले मदन भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार का, हा चर्चेचा विषय आहे.
किसनवीर उद्योग समूहाला भाजप सरकारद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस मदत केली ती जनहितासाठीच होती. मदन भोसले भाजपमध्ये आलेच तर पश्‍चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी भाजपला  फायदा होणार आहे.  
मात्र, सहकार क्षेत्रातील गाढा अभ्यास असणार्‍या या नेत्याला भाजप नक्की काय देणार? आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय बोलणार? मदनदादांवर कोणती जबाबदारी सोपवून कोणते पद देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर तिसर्‍या डिस्टिलरीचे उद्घाटन उद्या,  दि. 9 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होत आहे. यावेळी होणार्‍या मेळाव्यात काय घडते? काय मिळते याकडे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांसह जनतेचे डोळे लागले आहेत. दूरदृष्टी व सखोल, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेला व जनहित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा हा नेता विकास करण्यात मागे पडणार नाही, याची खात्री असल्याने जनमानसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोळा वर्षांपूर्वी किसनवीर साखर कारखाना शेतकरी सभासदांनी मदनदादांच्या हाती सोपवला. त्यावेळी कारखान्याची अवस्था बिकट होती. मदनदादांचा परीस स्पर्श या कारखान्याला होताच कायापालट झाला. आज किसनवीर कारखान्याचा देशात नावलौकिक आहे. तो फक्त आणि फक्त मदनदादांमुळे. सहकार क्षेत्रात त्यांनी एका कारखान्याचे ‘किसनवीर, खंडाळा व प्रतापगड’ असे तीन कारखाने केले. मदनदादांच्या मनात जनतेविषयी कळवळा नसता तर खंडाळा कारखाना आज दादांच्या मालकीचा झाला असता. दादा ज्या मुशीत घडले, त्या मुशीत त्यांना शिकवणच तशी मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जनहित आहे. आजच्या मेळाव्याकडे जनतेचे लक्ष लागले असून ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. नितीन गडकरी यांनी मदनदादांना मनासारखा, मनाला पटणारा व जनहिताच्या सेवेचा शब्द द्यावा आणि तो भर सभेत द्यावा, हीच अपेक्षा आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: