Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौघांना अटक; दोघे अल्पवयीन
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 12 : दि. 8 मार्च रोजी येथील जरंडेश्‍वर नाक्यावर एका युवकाला वर्चस्ववादातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने चौघांना अटक केली आहे. चौघांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याने दोघांनाच न्यायालयापुढे उभे केले जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समीर शेख पुढे म्हणाले, दि. 8 मार्च रोजी वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या निसर्ग धाब्यासमोर गौरव गणेश इंगवले (वय 25), रा. सदरबाझार, सातारा व त्यांचे सहकारी आणि सूरज ज्ञानेश्‍वर कदम (वय 24), रा. खेड, ता. सातारा, शुभम हिंदुराव चतुर (वय 23), रा. चिखली, (पिंपरी चिंचवड) आणि त्यांचे सहकारी यांच्यामध्ये वर्चस्ववादातून वादावादी झाली होती. तो विषय तिथेच संपला होता. त्यानंतर काही वेळाने गौरव गणेश इंगवले व त्याचे सहकारी मोटरसायकलवरून जरंडेश्‍वर नाका येथे बोलत बसले असताना त्या ठिकाणी सूरज ज्ञानेश्‍वर कदम, शुभम हिंदुराव चतुर व त्यांच्या सहकार्‍यांनी येऊन गौरव इंगवले यास कोयता व लोखंडी सळीने डोक्याला मारहाण केली. काही जणांनी गौरव इंगवले याच्या सहकार्‍यांच्या पाठीवर व दंडावर वार करून शिवीगाळ केली. यावेळी संशयित आरोपींनी दुचाकी मोडून तिचे नुकसान केले होते. याबाबतची फिर्याद गौरव इंगवले याने पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि स्वतः मी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि शाळीग्राम यांना तपासाच्या   सूचना करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुसळे, सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, पोलीस हवालदार रामभाऊ गुरव, तानाजी माने, पोलीस नाईक रवी वाघमारे, प्रवीण फडतरे, शरद बेबले, परिहार, सपकाळ, बोरसे, जाधव, चव्हाण आदींचे एक पथक तयार करून ते आरोपींच्या शोधासाठी तयार केले होते. संशयित आरोपी हे पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश गायकवाड, विशाल पवार यांच्या मदतीने सूरज ज्ञानेश्‍वर कदम, शुभम हिंदुराव चतुर या दोन संशयितांसह
अन्य दोन अल्पवयीन मुले अशा एकूण चौघांना अटक करण्यात
आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: