Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्रात आठ दिवसांत मोठे राजकीय भूकंप
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या मुलालाच भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला धक्का दिल्यानंतर येत्या आठ दिवसांत असे अनेक मोठे राजकीय भूकंप होतील, असे सूचक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. इतर पक्षांनी आता आपली ताकद आणि पैसा 2024 च्या निवडणुकीसाठीच वाचवून ठेवावा, हे ओमर अब्दुल्ला यांचे मत खरे ठरणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मंगळवारी डॉ. सुजय विखे- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या पाठोपाठ इतर पक्षातील अनेक बडे नेतेदेखील भाजपच्या मार्गावर असून लवकरच तुम्हाला मोठ्या राजकीय भूकंपाचे धक्के अनुभवायला मिळतील, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
2019 च्या निवडणुकीत पक्षाचा वेळ आणि पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही. तो 2024 साठी वाचवून ठेवावा, असा सल्ला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या वडिलांना दिला आहे. तो खराच आहे. कारण 2019 ची निवडणूक पूर्णपणे भाजप, रालोआच्याच बाजूने असणार आहे. त्यामुळे इतर पक्षांनी जास्त त्रास घेऊ नये, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: