Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहावी, बारावीच्या शिक्षकांना दिलासा
ऐक्य समूह
Thursday, March 14, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: mn3
लोकसभा निवडणुकीच्या कामातून वगळले
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परीक्षा काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दिल्या जाणार्‍या कामातून वगळण्यात आले आहे. याबाबाबत निवडणूक आयोगाने आज परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यातील किमान पन्नास हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी घेतले असून त्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी आमदार कपिल पाटील   आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍विनीकुमार यांच्याकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी ए. एन. वळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नेमलेल्या नियामक व परीक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका झाली आहे. या शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपले असते तर इयत्ता दहावी व बारावीच्या निकालांवर परिणाम होण्याची भीती होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: