Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला
ऐक्य समूह
Friday, March 15, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: na1
5 नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीत चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर करून मसूद अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयाबाबत आपला तांत्रिक विरोध नोंदवला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतीय नागरिक चांगलेच संतापले आहेत. मसूदला पाठिंबा देणार्‍या चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद करा असे मत अनेकांनी ट्विटवर मांडले आहे. ‘बॉयकॉटचायना’ आणि ‘बॉयकॉट चायनीज प्रॉडक्टस’, हे हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: