Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उसाच्या फडाला लावलेल्या आगीत एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, March 15, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 14 : खोडशी, ता. कराड येथे उसाच्या फडाला लावलेल्या आगीत भाजून एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कैलास मस्कू अर्जुन (वय 50), मूळ राहणार झरे, ता. आटपाडी सध्या राहणार खोडशी, ता. कराड हा गुर्‍हाळ कामगार बुधवारी रात्री उसाच्या शेताच्या फडात झोपला होता. दरम्यान शेतकर्‍यांनी उसाचा फड पेटविला असता त्यात तो भाजून जखमी झाला. त्याला प्रथम सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले, तदनंतर येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: