Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट
ऐक्य समूह
Tuesday, April 02, 2019 AT 11:45 AM (IST)
Tags: mn4
हवामान खात्याचा इशारा
5मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार दिवसात, मध्य महाराष्ट्रात पुढच्या तीन दिवसात तर विदर्भात पुढच्या पाच दिवसात उष्णतेची लाट असेल. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी 38-39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे  आवाहन हवामान विभागाने केले आहे. महाराष्ट्रात सोमवारी चंद्रपूरमध्ये 41 अंश, नागपूरमध्ये 40 अंश, औरंगाबाद 39 अंश, सोलापुरात 39 अंश, अक्कलकोट 38 अंश, बार्शी 38 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: