Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उदयनराजेंच्या रॅलीत चोरट्यांची दिवाळी
ऐक्य समूह
Wednesday, April 03, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
38 तोळे सोन्यासह 23 हजारांची रोकड लंपास
5सातारा, दि. 2 : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा येथे आज काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी तब्बल 38 तोळे सोन्यासह 23 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रारदारांच्या रांगा लागल्या होत्या.
शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय यशवंत भोसले, रा. भोसले मळा, राधिका रोड, सातारा यांची 3 तोळ्याची चेन, अशोक रामचंद्र पवार, रा. शिरढोण, ता. कोरेगाव त्यांची 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सुभाष तुकाराम जुवळे, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांच्या दीड तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन, बिबीशन लक्ष्मण कांबळे, रा. प्रतापसिंहनगर सातारा यांची 13 हजार 500 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण उत्तम कांबळे, रा. रविवार पेठ, सातारा यांची 7 तोळ्याची एक चेन व 2 हजार रुपये रोख, प्रमोद उत्तम कांबळे, रा. रविवार पेठ, सातारा यांची 3 तोळ्याची सोन्याची चेन, योगेश हनुमंत गुरव, रा. कुसवडे, ता. सातारा यांची 2 तोळ्याची सोन्याची चेन, संपत राघू देवरे, रा. समर्थ मंदिर, सातारा यांची अडीच तोळ्याची सोन्याची चेन, आनंद रमेश निकम, रा. शुक्रवार पेठ, सातारा यांची दीड तोळ्याची सोन्याची चेन, अजय मनोहर चव्हाण, रा. मल्हार पेठ, सातारा यांची 2 तोळ्याची सोन्याची चेन, संदीप विलास बाबर किकली, ता. वाई यांची 6 तोळ्याची सोन्याची चेन, संतोष चंद्रकांत बाबर, रा. किकली, ता. वाई यांची 2 तोळ्याची सोन्याची चेन, सुरेश दगडू शिर्के, रा. चिखली, ता. सातारा यांचे 7500 रुपये रोख, प्रकाश कोंडिराम गवळी, रा. गुरुवार पेठ, सातारा यांची 3 तोळ्याची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनेमध्ये एकूण 38 तोळे सोने आणि 23 हजार रुपयांची रोकड असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सराईत टोळी असण्याची शक्यता
मंगळवारी सातारा येथे उदयनराजे भोसले यांचा रॅलीने विराट जनसमुदायाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सराईत टोळी सातारामध्ये दाखल होऊन त्याच टोळीने साखळी पद्धतीने भर गर्दीमध्ये आपला हात साफ करून घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज असून ही टोळी सराईत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: