Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किरीट सोमय्यांचा पत्ता कट
ऐक्य समूह
Thursday, April 04, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 3 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणार्‍या किरीट सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे.
एकीकडे निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही सोमय्या यांच्या उमेदवारी अर्जाची घोषणा आली नव्हती तर दुसरीकडे मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते. यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण अखेर मनोज कोटक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचे सांगितले जाते.  
 मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्यं केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करूनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: