Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मालखेड व उंडाळे येथे चार लाखांची रोकड जप्त
ऐक्य समूह
Thursday, April 04, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि.3 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कराड तालुक्यातील मालखेड फाट्यावर संशयित वाहनांची तपासणी करणार्‍या स्थिर पथकाने इंडिगो कारमधून विनापरवाना वाहतूक करण्यात येत असलेली सुमारे पावणे दोन लाखांची रोकड जप्त केली तर उंडाळे चेकपोस्टवर कारमध्ये 1 लाख 92 हजाराची रोकड आढळून आली. सदरची रक्कम व्यापारातील असल्याचे सांगितले. मात्र, त्याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे, शांततेत व भयमुक्त वातावरण व्हावी, या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होऊन नये, यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने चांगलीच कंबर कसली आहे. तासवडे टोल नाका, ओगलेवाडी, निसरेफाटा या नंतर मालखेड फाटा येथे आज झालेली कारवाई पोलीस दलाच्या सर्तकपणाची साक्ष देत आहे.
बुधवारी सकाळपासून मालखेड फाटा येथे स्थिर पथकाचे प्रमुख विशाल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष जगदाळे, वाय. एच. खाडे, एस. एस. फडतरे व   महिला पोलीस एस.एन.कांबळे हे वाहनांची तापसणी करत होते. दुपारी 12 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या इंडिगो कारचे चालक लक्ष्मण सुरेश तोडकर यांनी पोलिसांच्या तपासणी मोहिमेची धास्ती घेतली. ही बाब पथकातील पोलिसांनी त्यांच्या पोलिसी नजरेत कैद करून कारची झाडाझडती घेतली. यावेळी कारमधून सुमारे पावणे दोन लाख रुपये पोलीस पथकास मिळून आले. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम बाळगणे किंवा वाहतूक करणे बेकायदेशीर असल्याने ही रक्कम जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी ती निवडणूक आयोगकडे सुपूर्द करण्यात आली आहे. उंडाळे चेकपोस्टवर बुधवारी दुपारी वाहनांची तपासणी सुरू होती. चेकपोस्टवर आलेल्या मारुती कारची (क्र. एम. एच.02 एयू 8730) तपासणी करताना कारमध्ये 1 लाख 92 हजाराची रोकड आढळून आली. कार चालक प्रकाश नाना वीर (रा.तुळसण, ता.कराड) यांनी ही रक्कम व्यापारातील असल्याचे सांगितले. मात्र,त्याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: