Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटणच्या उपअभियंत्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
ऐक्य समूह
Thursday, April 04, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 3 : पाटण तालुक्यातील सार्वजनिक विकास कामांच्या कोनशिला आचारसंहिता कालावधीत झाकण्याचे आदेश देवूनही त्या झाकल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहिता भरारी पथकाने पाटणच्या सार्वजनिक बांधकाम पश्‍चिम व दक्षिण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणच्या कोनशिला झाकण्याचे आदेश सर्वच संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. मात्र तरी देखील तालुक्यातील बाहे, मानगाव फाटा, नाटोशी येथे मान्यवर लोकप्रतिनिधींच्या नावे असलेल्या कोनशिला उघड्याच ठेवण्यात आल्या होत्या. आचारसंहिता भरारी पथकाने या ठिकाणी जावून पहाणी केली. त्यानंतर भरारी पथकाचे प्रमुख तथा कोयना बांधकाम विभागाचे शैलेंद्र शिवाजी येडके यांनी याबाबत पाटण पोलिसात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पश्‍चिम व दक्षिण उपअभियंता यांच्याविरूद्ध भा. द. वि. कलम 188 अन्वये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय गोतपागर
करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: