Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारताला मिळणार अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स
ऐक्य समूह
Thursday, April 04, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 3(वृत्तसंस्था) : अमेरिकेने सुमारे 2.4 अब्ज डॉलर किमतीचे 24 बहुपयोगी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टरची भारताला विक्री करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
भारताला मागील एक दशकाहून अधिक काळापासून इन हंटर हेलिकॉप्टरची गरज होती. लॉकहिड मार्टिनद्वारे निर्मित हेलिकॉप्टर पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जाते. यामुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार आहे.
ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी 24 एमएच 60 आर बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीस मंजुरी दिली. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय संरक्षण दल आणखी मजबूत होणार आहे. अमेरिकेने अधिसूचनेत म्हटले आहे, की प्रस्तावित विक्रीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंध आणखी मजबूत होतील. त्याचबरोबर अमेरिकेची विदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होण्यास मदत मिळेल.
या हेलिकॉप्टरची अंदाजे किंमत ही 2.4 अब्ज डॉलर असेल. यामुळे क्षेत्रिय संकटांना सामोरे जाण्यास भारताला मदत मिळेल आणि त्यांची गृह सुरक्षाही मजबूत होईल. हेलिकॉप्टर विक्रीमुळे खंडातील सैन्य संतुलन बिघडणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या मते हिंद महासागरात चीनचे आक्रमक धोरण पाहता भारतासाठी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टर आवश्यक होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: