Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपच्या पराभवासाठी महाआघाडीला मत द्यावे
ऐक्य समूह
Monday, April 08, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: na3
5उत्तरप्रदेश, दि. 7 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये बसपा, सपा आणि राष्ट्रीय लोकदल यांची पहिली संयुक्त जाहीरसभा झाली. काँग्रेसवर विश्‍वास ठेवू नका आणि भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडीला मत द्या, असे आवाहन बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुस्लीम समाजाला केले आहे. मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. महाआघाडीच्या रॅलीत लोटलेल्या जनसागराची माहिती मोदींना मिळाल्यावर ते वेडे होतील आणि ‘सराब-सराब’ म्हणत फिरतील, अशी टीका त्यांनी केली.
ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड झाली नाही तर निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल. भाजपच्या छोट्या-मोठ्या चौकीदारांनी काहीही केले तरी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. ‘अच्छे दिन’चं आश्‍वासन देऊन मोदींनी जनतेची दिशाभूल केली आहे. सरकारी तिजोरी लुटलीय. कुठल्याही तयारीविना नोटाबंदी आणि जीएसटी लागू केल्याने बेरोजगारी वाढली. तसेच आरक्षण व्यवस्था भाजपच्या काळात कमकुवत झाली. भाजपने धनदांडग्यांना अधिक श्रीमंत केले. यामुळे भाजपची सत्ता जाईल आणि महाआघाडी सत्तेत येईल, असे मायावती यांनी सांगितले.
मुस्लिमांनो भावनेच्या
आहारी जाऊ नका
काँग्रेसऐवजी महाआघाडीला मत द्या. महाआघाडीच भाजपला टक्कर देऊ शकते. महाआघाडीचा पराभव करणार्‍या उमेदवारांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. काँग्रेस उमदेवार पराभूत झाला काय किंवा जिंकला काय महाआघाडीचा उमेदवार निवडणुकीत पडला पाहिजे, असे काँग्रेसचे धोरण आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी काँग्रेसने सहारनपूरमध्ये इम्रान मसूदला उमेदवारी दिली आहे. पण उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करायचा असेल तर मुस्लीम समाजाने महाआघाडीच्या उमेदवाराला मत द्यावे. मोदींसोबत योगींनाही सत्तेतून बाहेर जावे लागेल. यामुळे मुस्लीम समाजाने यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन मायावती यांनी केले.
मायावती अडचणीत, निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
सहारनपूर येथील देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदची पहिली  संयुक्त प्रचारसभा वादात अडकली आहे. या सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्रमक शब्दात टीका केली.
सहारनपूर येथील देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदच्या पहिलीची संयुक्त प्रचारसभा वादात अडकली आहे. या सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्रमक शब्दात टीका केली. पण त्यांचे भाषण वादाचा विषय ठरला आहे. प्रचारसभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदानाचे अपील केले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: