Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाहनाच्या धडकेत एक ठार
ऐक्य समूह
Wednesday, April 10, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 9 : रुग्णालयातून बाहेर येवून चालत महामार्गावरुन जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एक जण ठार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मलकापूरजवळील अक्षता मंगल कार्यालयासमोर घडली. दत्तात्रय रामचंद्र कोकाटे (वय 30, रा. जयराम स्वामी वडगाव, ता. खटाव) असे ठार झालेल्या रुग्णाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तात्रय कोकाटे हे हाताच्या शस्त्रक्रियेसाठी येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले होते. दोन दिवसात त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मंगळवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास कोकाटे हे रूग्णालयातून बाहेर गेले. ते अक्षता मंगल कार्यालयासमोरील कोल्हापूर-कराड  लेनवर आल्यावर त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला.  अपघाताची नोंद  शहर पोलीस ठाण्यात  झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: