Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिरवळ पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल पाचवड येथे बेशुद्धावस्थेत सापडला
ऐक्य समूह
Wednesday, April 10, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: re2
5भुईंज, दि. 9 : शिरवळ पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल वाघिरे पाचवड उड्डाणपुलाजवळ बेशुद्धावस्थेत सापडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भुईंज पोलीस ठाण्याचे मदतकार्य वेळेत मिळाल्याने त्या कॉन्स्टेबलवर सातारा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र सोमवारी रात्री अकरा वाजता बेशुद्धावस्थेत सापडलेले कॉन्स्टेबल मंगळवारी रात्रीपर्यंत शुद्धीवर आले नव्हते.
 या बाबत भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि. श्याम बुवा यांनी सांगितले, की सोमवारी रात्री अकरा वाजता आम्हाला पाचवड उड्डाण पुलानजीक खाकी रंगाची पॅन्ट घातलेला इसम बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदर इसम हा शिरवळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेची माहिती मिळाली. त्याला तातडीने सातारा येथे उपचारासाठी पाठवले. मात्र, तो इथे बेशुद्धावस्थेत कसा काय पडला याचा तपास सुरू आहे. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी भुईंज पोलीस व आम्ही प्रयत्न करत आहोत. संबंधित कॉन्स्टेबलवर यशवंत न्यूरो सर्जन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ते शुद्धीवर आल्यानंतर अधिक माहिती मिळेल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: