Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एमआयडीसीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: lo2
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुर्घटना
5सातारा, दि. 11 : एमआयडीसीमध्ये दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की चंद्रकांत रघुनाथ सावंत (वय 40), रा.खोकडवाडी, ता.सातारा हे बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्प्लेंडर दुचाकीवरून नवीन एमआयडीसी येथे जेवणाचा डबा देऊन परत येत असताना टॉप गिअर कंपनीसमोरदुचाकीला कुत्रे आडवे आल्याने ते खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: