Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गडचिरोलीतील ‘त्या’ चार मतदान केंद्रांवर आज मतदान
ऐक्य समूह
Monday, April 15, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: mn3
5गडचिरोली, दि. 14 (वृत्तसंस्था) :  गडचिरोलीमध्ये 4 मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी नक्षलवादी संबंधित घडामोडी सुरु असल्याने पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे तिथे दि. 11 एप्रिल रोजी मतदान हाऊ शकले नव्हते. या मतदान केंद्रांवर सोमवार, दि. 15 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .
गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात 110 वाटेली, 112 गारडेवाडा, 113 गारडेवाडा (पुस्कोटी), 114 गारडेवाडा (वांगेतुरी) येथे 15 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 3 या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
110 वाटेलीमध्ये रूम नं. 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, 112 गारडेवाडा,-रूम नं. 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, 113 गारडेवाडा (पुस्कोटी) रूम नं. 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा तर 114 गारडेवाडा (वांगेतुरी) रुम नं. 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा येथे मतदान होणार आहे.
गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी रात्री 8 पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंतिम 72.02 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
नक्षलवादी संबंधित घडामोडी सुरु असल्याने पथक मतदान केंद्रावर पोहचू शकले नव्हते. त्यामुळे चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकलण्यात आले होते.  नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले होते. नक्षलवाद्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता.  मतदानाच्या दिवशीही पोलिसांसोबत चकमक, सी 60 कमांडो पथकावर हल्ला, अशा कुरापती सुरुच होत्या.  स्फोटानंतर सुरु असलेले ऑपरेशन आणि सततच्या गोळीबारामुळे निवडणूक अधिकारी संबंधित चार केंद्रांवर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इथले मतदान पुढे ढकलण्यात आले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: