Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अभिजित पाटील यांना 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
ऐक्य समूह
Friday, April 19, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 18 : फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांना लाच मागितल्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांपुढे उभे केले असता त्यांना 30 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा येथील एका फसवणुकीच्या प्रकरणात भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये तडजोड करण्याचे ठरले. या तडजोडीसाठी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील यांनी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला मात्र संशय आल्याने अभिजित पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे आणि सातारा येथील पथकांनी संयुक्त कारवाई करत त्यांना काल ताब्यात घेतले होते. अभिजित पाटील यांना आज येथील जिल्हा न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची 30 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: