Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जावयाकडून सासर्‍याचा निर्घृण खून
ऐक्य समूह
Friday, May 03, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
करंजे येथे घरगुती वादातून घटना
5सातारा, दि. 2 : सातारा शहराजवळ करंजे परिसरातील बौद्ध वस्तीतील विलास महादू बनसोडे (रा. दौलतनगर, रानमळा, सातारा) यांचा जावई मनोज दोडमणी याने पैंजण टाईल्सजवळ लाकडी दांडके व लोखंडी रॉडने जबर मारहाण करून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली.
घरगुती वादातून ही घटना घडल्याचे समजते. याबाबत माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा, जबाब नोंदवण्याचे व फिर्याद दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेनंतर संशयित मनोज दोडमणी पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: