Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिवड बसथांब्याजवळ बोलेरो व दुचाकीच्या अपघातात दोघे ठार
ऐक्य समूह
Monday, May 06, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re3
5म्हसवड, दि. 5 : म्हसवड-मायणी रस्त्यावर दिवड बसथांब्याजवळ बोलेरो गाडी व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, बोलेरो गाडी (क्र. एम. एच.16 -एजी - 2293) ही गाडी तुळजापूरहून दर्शन घेऊन आपल्या धोंडेवाडी, ता. खटाव या गावी निघाले होते. बोलेरो गाडी दिवड बस थांब्याच्या थोडे पुढे आल्यानंतर समोरुन येणार्‍या बजाज डिस्कव्हर (क्र. एम. एच.-10 एटी 2487) या दुचाकीशी धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती, की यामध्ये दुचाकीचे पुढील चाक मोडून पडले. हेड लाइट तुटून पडली तर बोलेरो गाडीचा बंपर रॉड वाकून गाडीची काच फुटून बाजूला पडली होती. 
या धडकेत दुचाकीवरील कुंडलिक दादासाहेब जानकर (वय 28) व शशिकांत शिवाजी जानकर (वय 30), दोघे रा. भेंडवडे, ता. खानापूर, जि. सांगली हे ठार झाले. सपोनि. देशमुख तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: