Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाणीसाठ्याचा अवैधरीत्या होणारा उपसा रोखा : सिंघल
vasudeo kulkarni
Monday, May 06, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 5 : माण व खटाव तालुक्यासाठी उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या उपलब्ध पाणीसाठ्याचा कुठेही अवैधरीत्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी रविवारी दिल्या.
दहिवडी तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चारा छावणीमध्ये शिधा पत्रिकांचा कॅम्प आयोजित करावा अशा सूचना करुन जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, छारा छावणीमध्ये दाखल झालेल्या जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी टॅगिंग करावे. छारा छावणीतील जनावरांना रोजच्या रोज चारा, पाणी व पेंड व्यवस्थित मिळते, की नाही याची वेळोवेळी तपासणी करावी. या संदर्भात छावणीतील शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी. तसेच पेंडीचे स्टॉक रजिस्टर वेळोवेळी तपासावे. चारा छावणीतील जनावरांचे 100 टक्के लसीकरण करावे. चारा छावणीतील हालचाल रजिस्टर वेळोवेळी तपासावे. इरिगेशन, पोलीस व महसूल विभागाने आपापसात समन्वय साधून अवैधरीत्या उपसा कुठेही होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: