Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सासर्‍याच्या खून प्रकरणी जावयासह अन्य एकाला अटक
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : करंजे येथील बौद्ध वस्तीमध्ये सासर्‍याचा खून केल्या प्रकरणी जावई व त्याच्या सहकार्‍याला शाहूपुरी पोलिसांनी आज अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, की गुरुवार दि. 3 मे रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास मनोज उर्फ मल्लिकार्जुन दोडमणी, रा. बौद्ध वस्ती, करंजे आणि त्याचा सहकारी मल्लिकार्जुन शंकर गोडबोले यांनी करंजे ते भूविकास बँकेकडे जाणार्‍या रोडवर बनसोडे चिकन सेंटर समोरील कट्ट्यावर सासरे विलास महादू बनसोडे (वय 60) यांना बौद्ध वस्तीत बांधलेल्या नवीन घरावरून सुरू असलेल्या वादाच्या कारणावरून चिडून जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडके व लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर जबर मारहाण करून त्यांचा खून केला होता. या घटनेनंतर दोघेही फरार झाले होते.
या घटनेची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी विविध ठिकाणी पोलीस पथके पाठवली होती. संशयित हिरापूर, ता. जि. गुलबर्गा, कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक करून सातार्‍यात आणले. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: