Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ठोंबरेवाडी येथे आगीत 13 लाख रुपयांचे नुकसान
ऐक्य समूह
Friday, May 10, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re4
दोन म्हशी, 12 कोंबड्या, सोन्याचे दागिने व रोकड भस्मसात
5सातारा, दि. 9 : ठोंबरेवाडी, ता. सातारा येथे बुधवारी रात्री लागलेल्या आगीत 13 लाख 5 हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यामध्ये दोन म्हशींसह 12 कोंबड्या व सोन्याचे दागिने, रोकड भस्मसात झाल्याने बाबर कुटुंबीय उघड्यावर पडले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुदाम बाबर (वय 70) व त्यांचा भाऊ बबन बाबर यांचे ठोंबरेवाडी, ता. सातारा येथे जवळ जवळ घर आहे. बबन बाबर यांचे कुडामातीचे घर असून त्याच्या शेजारीच सुदाम बाबर यांचे  गोट्यासारखे घर आहे. दोन्ही बाबर कुटुंबीय बुधवारी रात्री 10.30 वाजता  जेवण करून झोपले असता रात्री बाराच्या दरम्यान गोट्यासारख्या घराला आग लागली. ही बाब लक्षात येताच गावकर्‍यांनी एकत्र येऊन आग विझवण्याचा आटोकोट प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आग भडकत असल्याचे निदर्शनास येतात सातारा येथून अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या गाडीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत दोन म्हशींसह 12 कोंबड्या, सोन्याचे दागिने, रोकड, संसारोपयोगी साहित्य, कडधान्य, कपडे असे एकूण 12 लाख 5 हजार रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. या घटनेची फिर्याद सुदाम बाबर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: