Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाडळीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई
ऐक्य समूह
Friday, May 10, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
24 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक
5कोरेगाव, दि. 9 : सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कोरेगाव पोलिसांना बरोबर घेत पाडळी (सातारारोड) येथील भीमनगर फाटा येथे बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त केला. या डंपरसह एक कार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत माहिती अशी, संतोष सोळसकर यांच्या डंपरमधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर शेख यांनी आपल्या कार्यालयातील आणि कोरेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी घेऊन भीमनगर फाटा येथे बुधवारी रात्री सापळा रचला. वडूथ बाजूने वाळू भरून येत असलेला डंपर दिसला. पोलिसांनी तो जप्त केला. त्याचबरोबर एक मारुती स्विफ्ट कार आणि मोटारसायकल जप्त केली. डंपरमालक संतोष सोळसकर (रा. नांदवळ), डंपरचालक अन्सार सुतार   (रा. कठापूर), सूरज फाळके व प्रवीण फाळके (दोघे रा. सातारारोड-पाडळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोळस्कर वगळता तिघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: