Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुचाकी-ट्रक अपघातात पती जखमी; पत्नीचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, May 17, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: re1
5मल्हारपेठ, दि. 16 : येराडच्या येडोबा देवाचे देवदर्शन घेऊन निघालेल्या जोडप्याचा उरुल घाटात अपघात झाला. उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेचले, ता. सातारा येथील धर्मराज सोपान धनवडे (वय 37) व मोनिका धर्मराज धनवडे हे दोघे पती-पत्नी बुधवारी पाटण तालुक्यातील येराड येथील येडोबा देवाच्या दर्शनासाठी आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते मार्गस्थ होत असताना निसरे फाट्यावरील उरुल घाटाच्या मुख्य वळवणावरच दुपारी 2.45 वाजण्याच्या  सुमारास टीव्हीएस स्कूटी (क्र. एम. एच. 11 बी. एफ. 9250) व समोरून उंब्रजवरून पाटणकडे  येत असणारा ट्रक (क्र. एम. एच. 40/9864) यांचा अपघात होऊन धर्मराज सोपान धनवडे (वय 37) व त्यांची पत्नी मोनिका धर्मराज धनवडे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. मोनिका धनवडे यांंना तातडीने कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. उपचारा दरम्यान, गुरूवारी मोनिका यांचा मृत्यू झाला.   
 त्यानंतर ट्रक चालक शंकर बाळासाहेब डोंगरे (रा. रेठरे, ता. कराड) याच्याविरुध्द भरधाव ट्रक चालवत ताबा सुटल्याने अपघात झाल्याची फिर्याद शिवराज सोपान धनवडे (वय  32) यांनी  मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात दाखल केली असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अतिग्रे करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: