Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेंद्रे नजीक पुलावरून कंटेनर कोसळला
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: re3
5शेंद्रे, दि. 17 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामर्गावर शेंद्रे नजीक प्रियांका शू मार्ट जवळील पुलावरून कंटेनर सर्व्हिस रस्त्यावर कोसळल्याने कंटेनरचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा कंटेनर चक 46 -ठ 7083 हा उड्डाण पुलावरून जात असताना अचानक ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर उड्डाण पुलावरून सुरक्षा कठडा तोडून अचानक सुमारे 25 फुटांवरून सेवा रस्त्यावर आदळला. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. महामार्गानजीकच्या सेवा रस्त्याच्या कडेला लोकवस्ती असून नेहमी रहदारी चालू असते, मात्र अपघातावेळी रस्त्यावर रहदारी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.  मात्र, कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: